काँग्रेस आजी-माजी जिल्हाध्यक्षांचा आरोप
सावंतवाडी : प्रतिनिधी
केंद्र व राज्यातील सरकार जिल्ह्यात उद्योगधंदे आणण्यास अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली राज्य व केंद्र सरकारवर नाराज आहेत.आडाळी एमआयडीसीमाध्यमातुन ते नाराजी व्यक्त करीत आहेत., केंद्रातील उद्योग मंत्री नारायण राणे व राज्यातील उद्योग मंत्री उदय सामंत याच्या कामकाजाबाबतही त्याची नाराजी आहे . त्यांच्या बोलण्यातून दिसून येते येत आहे, असा आरोप जिल्हा काँग्रेसने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.
आडाळी एमआयडीसी बाबत तेथील कृती समितीने लॉन्ग मार्च काढला होता. याला काँग्रेसने पाठिंबा देऊन सहभाग दर्शवला . जिल्ह्यात उषाइस्पातनंतर कुठलाही मोठा उद्योग धंदा आला नाही. हे येथील राज्यकर्त्यांचे अपयश आहे. येथील युवकाना नोकरीसाठी गोव्यात जावे लागत आहे. येथील राज्यकर्त्यांमुले ही युवकावर वेळे आली आहे.
गेले दीड दोन वर्ष केंद्रात व राज्यात यांचेच उद्योग मंत्री आहेत, असे असताना जिल्ह्यात या कुठलेही उद्योगधंदे आणू शकले नाहीत याचीच खंत तेली यांना असावी त्यामुळे ते असे वक्तव्य करत असावे असा टोला देखील त्यांनी लगावला. राजन तेली महायुतीतील नाराज आहेत काय, ते आघाडीत येणार आहेत काय असे विचारले असता जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत यांनी हे त्यांनाच विचारा असे सांगितले. संपर्क मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील हे विधान परिषद विरोधीपक्ष नेते होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी जिल्हाध्यक्ष विकास सावंत,तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर,उप तालुकाध्यक्ष समीर वंजारी , शहराध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर, बाळासाहेब नंदी आळी, बाबल्या म्हापसेकर,माया चिटणीस, सुमेधा सावंत, अमेदी मिस्त्री, सुधीर मल्हार,उपस्थित होते .









