आ . दीपक केसरकरांच्या विजयाबद्दल मिठाई भरवून मानले आभार
वेंगुर्ले (वार्ताहर)-
सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या 39 हजार मताधिक्याने विजय झाला. या विजयात दीपक केसरकर यांच्या पाठशी ठाम रहात त्यांना विजयाचा आशिर्वाद देणारे वेंगुर्ले शहरातील जेष्ठ व्यापारी मनमोहन दाभोलकर यांची आज मंगळवारी सावंतवाडी येथील दिपक केसरकर मित्रमंडळाचे अध्यक्ष तथा दिपकभाईंचे निकटचे सहकारी व सावंतवाडीचे माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे यांनी भेट घेत त्यांनी मिठाई भरवत त्यांचे दिपकभाईंच्यावतीने आभार मानले.यावेळी त्यांच्या समवेत शिवसेनेचे जिल्हा संघटक सुनिल डुबळे, अमर दाभोलकर, वेंगुर्लेतील रिक्षा संघटनेचे पदाधिकारी शेखर धावडे आदी उपस्थित होते.









