शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी सुपूर्द केले नियुक्तीपत्र
मालवण | प्रतिनिधी : शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्ष पदी राजन (राजा) गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी राजा गावडे यांना सुपूर्द केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेना मुख्य नेते श्री. एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग ठेकेदार संघटना अध्यक्ष म्हणून राजा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. चौके गावचे सरपंच पद भूषवलेले राजा गावडे हे शिवसेना उपजिल्हा प्रमुख म्हणूनही कार्यरत आहेत.









