राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर याला भाजप जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. यावर आता मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी एका मुलाखती प्रतीक्रिया दिली आहे. शिवसेनेतील फुटीला उद्धव ठाकरेच जबाबदार असल्याचे त्य़ांनी सांगितले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मला भेटायला आले होते. उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका असं मी त्यांना म्हणालो असंही त्यांनी सांगितलं.
यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेनेत जी बंडखोरी झाली त्याला उध्दव ठाकरेच जबाबदार आहेत. ती गोष्ट तुम्ही,अमित शहा किंवा भाजपने घडवलेली नाही. त्यामुळे याचं श्रेय तुम्हाला उद्धव ठाकरेंनाच द्यावं लागेल.उगाच फुकटचं श्रेय घेऊ नका अस फडणवीसांना म्हणताच ते हसायला लागले. पुढे बोलताना ते म्हणाले, बंडखोर आमदारांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप-प्रत्यारोप केले. परंतु शिवसेनेतील फुटली संजय राऊत जबाबदार नाहीत. ते सकाळी टीव्हीवर येतात, त्यांची ती स्टाईल आहे. त्यांचा तो अहंकार आणि त्यांची बोलण्याची शैली यामुळे माणसं वैतागली आहेत.
हेही वाचा- Kolhapur : गड-किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करा, राज्यातील गडप्रेमी हजारोंच्या संख्येने पन्हाळगडावर दाखल
राऊत रोज तेच तेच बोलतात, से लोकही म्हणू लागले आहेत. सकाळी नऊ वाजता बोलणारे आता कमी बोलू लागलेत त्याचे काय कारण आहे मला माहित नाही. तुम्ही त्यांना शिव्या देवू नका प्लीज.त्यांचे आभार माना.कारण हे सरकार येण्यात त्यांचा जेवढा वाटा तेवढा इतर कुणाचाच नाही, असा टोलाही त्यांनी राऊतांना लगावला.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








