Raj Thackeray : नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात उरूसच्या दरम्यान काही तरुण देवाला धूप दाखविण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आग्रही होते, मात्र त्यांना सुरक्षा रक्षकांनी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला,त्यामुळे वाद निर्माण झाला होता.त्यानंतर उरुस आयोजकांनी पुढच्या वर्षीपासून त्र्यंबकेश्वराला धूप न दाखवण्याचा निर्णय घेतला. या मंदिराच्या मुद्द्यावरून गेले चार दिवस महाराष्ट्रात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत आज माध्यमांशी संवाद सादत या घटनेवर भाष्य केलं. वर्षानुवर्षे जर एखादी परंपरा असेल तर त्या प्रथेला थांबवणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले, हा प्रश्न गावकऱ्यांनी सोडवायचा आहे इतरांनी त्यात लुडबूड करु नये. वर्षानुवर्षे जर एखादी परंपरा असेल तर त्र्यंबकेश्वरमधील प्रथा थांबवणं योग्य नाही.महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लोक दर्गात जातात.अनेक अशी मंदिर आहेत जिथ हिंदू-मुस्लिम सौख्य आहे. अनेक गावात दर्गाचा ऊरुस असतो. जे हिंदू-मुस्लिम ऐक्याचं प्रतीक आहे. एवढचं नाही तर माहीम दर्गात ऊरूसाला माहीम पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल चादर चढवतो. अशी अनेक उदाहरण आहेत. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आल्याने भ्रष्ट होतो. इतका धर्म कमकुवत आहे का? असा सवालही त्यांनी केला.या आधी मी अनेक दर्गा, मश्चिदमध्ये गेलो आहे.मला अस वाटतं माणसाची बघण्याची वृत्ती छोटी आहे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, यामध्ये दंगे करण्याचा कोणाचा प्रयत्न आहे का? ज्या गोष्टी चुकीच्या घडतील तिकडे प्रहार करणं गरजेचं आहे.लाऊडस्पीकर,समुद्रातील दर्गा,गड-किल्यांवरती असलेला दर्गा हटवलाच पाहिजे.ज्या गोष्टी दिसताहेत त्याला विरोध केलाचं पाहिजे.पण जाणून-बुजून काहीही काढणं याला काही अर्थ नाही. आतापर्यंतचा महाराष्ट्राचा इतिहास पाहिला तर काही ठिकाणी हिंदू-मुस्लिम एकत्र राहतात त्याठिकाणी दंगली घडत नाहीत. मात्र काही लोकांनी जाणीवपूर्वक सामाजिक स्वास्थ बिघडवलंय असा आरोपही केला.
Previous Articleएकनाथ शिंदे भाजपलाही डोईजड ठरू शकतात
Next Article आरटीईसाठी 22 मेपर्यंत पुन्हा मुदतवाढ








