ऑनलाईन टीम / तरुण भारत :
निजामाच्या औलादी येऊन संभाजीनगरमध्ये औरंगजेबाच्या कबरीवर माथा टेकतात, अन् तुम्हाला लाजा वाटत नाहीत. काही पक्षांनी हिंदु-मुस्लिम मतांच्या ध्रुवीकरणासाठी एमआयएमला मोठं केलं. आता ते वळवळ करायला लागलेत. तिथे शिवसेनेचा खासदार पडला आणि एमआयएमचा निवडून आला. तरीही हे सगळे लोण्याच्या गोळ्यासारखे थंड आहेत. शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो का, असा सवाल करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी विरोधकांवर निशाणा साधला.
पुण्यात आयोजित सभेत ते बोलत होते. राज ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडीचं सरकार औरंगाबादचं संभाजीनगर असं नामांतर जाणीवपूर्वक करत नाही. ते निवडणुकीसाठी तो मुद्दा ठेवतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संभाजीनगर नाव करून हा विषय संपवून टाकावा. संभाजीनगरमध्ये निजामाच्या औलादी येऊन शिवछत्रपतींना मारण्यासाठी आलेल्या औरंगजेबाच्या कबरीवर डोकं ठेवतात आणि आम्हाला लाज, शरम काहीच वाटत नाही. शरद पवारांना औरंगजेब हा सुफी संत वाटत असेल तर काय बोलणार? पवार म्हणतात, अफजलखान हा शिवाजी महाराजांना मारायला आलाच नव्हता, तो आपला धर्म वाढवण्यासाठी आला होता, आता यावर काय बोलावं? अशा राजकारणामुळेच निजामांच्या अवलादी महाराष्ट्रात वळवळ करू लागल्या आहेत. त्यांना कळातही नाही की आपण राक्षस वाढवतोय.
शिवसेनेमुळे औरंगाबादेत एमआयएमचा खासदार निवडून आला. आता लोक आता औरंगजेबाच्या कबरीवर लोक डोकं टेकवण्याची हिंमत करत आहेत. औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवल्यावर महाराष्ट्र खवळेल असं वाटलं होतं, मात्र सगळे शातं आहेत. अफजल खानाच्या कबरीचा विस्तार आता, 15 ते 20 हजार फुटात झाला आहे. तिथे मशिद उभी राहिली असून, त्याला निधी दिला जातोय. मात्र, आम्ही लोण्याच्या गोळ्याप्रमाणे थंड आहोत.