Raj Thackeray : २५ ऑगस्टपासून मनसेची राज्यभर सदस्य नोंदणी करण्यात येणार आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून तळागाळात पोहोचा असा आदेश आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना दिला. शस्त्रक्रियेनंतर आज घेतलेल्या बैठकित त्यांनी आदेश दिला. राज ठाकरे यांनी आज मनसैनिकांशी संवाद साधला.
यावेळी ते म्हणाले, लोक सध्या राजकारणाला कंटाळले आहेत. लोकं पर्याय शोधत आहेत. आणि आपण तो पर्याय आहोत.लोकं आपला विचार करतायत. आपल्याला मतं देण्यास तयार आहेत. तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. सदस्य नोंदणीच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचा. आपण केलेली कामं लोकापर्यंत पोहोचवा. वेगवेगळे कार्यक्रम घेऊन लोकांना पक्षाशी जोडा. योग्यरित्या काम केल्यास यंदा आपल्याला यश नक्की मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
Trending
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव
- Sangli Politics : राष्ट्रवादीचे दोन्ही गट सज्ज! कवठेमहांकाळात निवडणुकीची रणधुमाळी








