Sanjay Raut Slams Raj Thackeray: ‘आमच्यावर टीका करणाऱ्यांनी बुलढाण्याची सभा पाहावी.उद्धव ठाकरे यांचं भाषणही त्या दिवशीचं ऐकावं. आख्खा बुलढाणा उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी रस्त्यावर उतरला होता.उद्धव ठाकरे यांच्यावर किंवा आणखी कोणावर टीका करून तुमचं राजकारण किती काळ चालणार? काही विधायक काम करा. संघटनात्मक काम करा,असा सल्ला खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिला. काल मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल करून त्यांच्यावर सडकून टिका केली होती. यावर आज राऊतांनी उत्तर दिलं आहे.मुंबईत ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, तुम्ही आता मॅच्युअर्ड झालेला आहात. हे आवाज काढणं, अमूक करणं, तमूक करणं वगैरे खूप झालं.काही विधायक काम करा.संघटनात्मक काम करा.शिवसेना ही कामं करतेय.आमच्यावर अनेक संकटं आली आहेत,तरी आमचा पक्ष उभा राहतोय,लढतोय,काम करतोय असेही ते म्हणाले. राज ठाकरे यांना टोला लगावताना ते म्हणाले, ‘आम्हाला मिमिक्री पाहायची असेल तर आम्ही ओरिजिनल कलाकारांची पाहू. आम्ही जॉनी लिव्हरची मिमिक्री पाहू. आम्हाला राजू श्रीवास्तव आवडायचा. त्यांचे मुद्राभिनय, नाट्याभिनय पाहू. इतर अनेक कलाकार आहेत, ती खरी मिमिक्री बघू. ‘भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं राहुल गांधी यांनी मागच्या तीन महिन्यांत प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यांच्यावर टीका करणाऱ्यांनी चार दिवस तेवढे कष्ट करून दाखवावेत,’असं आव्हानच राऊत यांनी राज ठाकरेंना दिलं.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








