पुणे : मनसे प्रमुख राज ठाकरे यांची पुण्यातील 21 मे रोजी होणारी नियोजित सभा रद्द करण्यात आली आहे. मनसेने पावसाचे कारण देत ही सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले आहे. (Raj Thackeray meeting in pune cancelled)
डेक्कन नदीपात्रात राज ठाकरे यांची सभा घेण्याचे नियोजन मनसेने केले होते. त्यासाठी पोलिसांकडे परवानगी देखील मागण्यात आली होती. मात्र, त्यासाठी पोलिसांनी काही अटी सांगितल्या होत्या. त्यानंतर मनसेने ही सभा पावसाचे कारण देत रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचे पत्र डेक्कन पोलिसांना देण्यात आले आहे. सभा रद्द झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यातील सामना आता अनुभवता येणार नाही. राज ठाकरे हे देखील आता पुण्यातून मुंबईकडे रवाना झाले. अन्यथा, त्यांचा चार-पाच दिवस पुण्यात मुक्काम ठरला होता.