मुंबई; मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्य सरकार घाबरले. १ मे रोजी औरंगाबाद येथे राज ठाकरे यांची सभा झाली. या सभेत पोलिसांनी घातलेल्या शर्तींचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई होत नाही. त्यावरून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी महाविकास आघाडी सरकारला घराचा आहेर दिला आहे.
द प्रिंन्टच्या वृत्तानुसार, राज्यातील जातीय तणाव भडकवण्यापासून रोखणे आवश्यक आहे. असे दाखले देत काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी राज ठाकरेंना अटक करावी अशी मागणी केली आहे. कारवाई होत नसल्याबद्दल त्यांनी मुंबई पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्र पोलिसांनी औरंगाबाद येथील सभेसाठी १६ अटी घातल्या होत्या. त्यापैकी १२ अटींचे उल्लंघन केले आहे. राज ठाकरे यांच्या विरोधात दोन न्यायालयांचे अजामीनपात्र वॉरंट आहेत. मुंबई पोलीस काहीच का करत नाहीत हे मला समजत नाही. सरकारला राज ठाकरेंची भीती वाटत आहे,” असे संजय निरुपम म्हणाले.कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, असे ते म्हणाले. देशात आणि महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे आणि जो कोणी कायद्याला आव्हान देईल त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे, असेही संजय निरुपम म्हणाले.