Prajakta Mali : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने ‘प्राजक्तराज’ या नावाने स्वतःचा ज्वेलरी ब्रॅण्डस काल सुरू केला. काल उदघाटन सोहळ्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील कार्यक्रमाला उपस्थित होत्या. या प्रसंगी बोलताना राज यांनीही तिचं कौतुक केलं आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या प्रत्येक स्किटला जसे महाराष्ट्राचे प्रेक्षक ज्या पद्धतीची दाद त्या देतात, तुमच्या दागिन्यांना देखील प्रेक्षक तशीच दाद देवोत अशी शुभेच्छा.’ राज यांची प्रतिक्रिया ऐकून प्राजक्तानेही भारावून आदराने हात जोडले.
यावेळी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, प्राजक्ताने ‘प्राजक्तराज’ या नावाने स्वतःचा ज्वेलरी ब्रॅण्ड सुरू केला आहे. अस्सल महाराष्ट्रीयन आणि पारंपरिक दागिने ‘प्राजक्तराज’ मध्ये प्रेक्षकांना मिळणार आहेत. लोप पावत आलेले दागिने नव्याने घडवून प्राजक्ता एकप्रकारे संस्कृती जपण्याचं काम करत आहे. प्राजक्ता आज जे करतायत ते कौतुक करण्यासारखं आहे. मला वाटतं त्यांच्यासारख्या अनेक मुली पुढे येतील आणि ही संस्कृती जपतील. मी फक्त एवढंच म्हणेन की ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ च्या प्रत्येक स्किटला जसे महाराष्ट्राचे प्रेक्षक ज्या पद्धतीची दाद देतात, तुमच्या दागिन्यांना देखील प्रेक्षक तशीच दाद देवोत अशी शुभेच्छा.
या कार्यक्रमात ‘प्राजक्तसाज’ या नावावरून देखाल खूप चर्चा झाली. ज्वेलरी ब्रँडचं नाव ‘प्राजक्तसाज’ असंच का निवडल याच उत्तर देताना प्राजक्ता म्हणाली की, ‘प्राजक्तसाज’ हे छान नाव आहे पण त्यावरून लगेच कळतं की हा दागिन्यांचा ब्रँड असेल. म्हणून मी हे नाव ठेवलं नाही. तर ‘राज’ या शब्दात एक भारदस्तपणा आहे, या शब्दाला एक वजन आहे. कुठल्याही शब्दाला ‘राज’ जोडलं की त्याचं वजन वाढतं. एखादा देखणा मुलगा असेल तर त्याला आपण राजबिंडा असं म्हणतो. तसंच माझ्या दागिन्यांचंही आहे. म्हणून याला ‘प्राजक्तराज’ हे नाव दिलं.
Previous Articleशिंदे-फडणवीस सरकार व्हेंटिलेटरवर; फेब्रुवारी महिना बघणार नाही
Next Article फडतरवाड़ीत भर रस्त्यात तरुणाचा खून









