जे लोक सारखं खोके- खोके म्हणून ओरडत आहेत त्यांच्याकडे कंटेनर असल्याचे विधान महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या या विधानाने शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर निषाणा साधला आहे. तसेच त्यांनी उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात कोव्हिड महामारीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा पनवेलमध्ये पार पडला. या मेळाव्यात राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. तसेच काही राजकिय विधानेही केली आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मुख्य़मंत्री एकनाथ शिंदे गटावर ठाकरे गटाकडून करण्यात येणाऱ्या “50 खोके…एकदम ओके..” या घोषणेचाही समाचार घेतला. ते म्हणाले “हे लोक प्रत्येक वेळी येतात आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन तुम्हाला इमोशनल करतात. आज हे जे ओरडत आहेत ना खोके- खोके त्यांच्याकडे कंटेनर्स आहेत. कोविड पण या लोकांनी सोडला नाही. हेच तुमच्याकडे येऊन निवडणुकीच्या तोंडावर आणि कुणालातरी दाखवणार.”असा टोला त्यांनी उद्धव ठाकरे यांनी हाणला आहे.
शिवसेनेत बंड करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपबरोबर जाऊन सत्तेत वाटा घेतला. तेव्हापासूनच ठाकरे गटाकडून त्यांना गद्दार- गद्दार असे म्हणून त्यांना ५० खोके…एकदम ओके असे म्हणून डिवचले जात आहे. उद्धव ठाकरे गटाची ही घोषणा त्यानंतर महाविकास आघाडीतील इतर पक्षाने देखिल उचलली आहे. शिवसेनेच्या या घोषणेवर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली.