Raj Kundra Case : काही दिवसापूर्वी उद्योगपती राज कुंद्रावर पाॅर्न चित्रपट बनवणे आणि ती ऑनलाईन प्लॅटफाॅर्मवर विकण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर राज कुंद्रा काही काळ तुरुंगातही होता. आता त्याने या आरोपातून सुटका करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे.सरकारी वकीलाने न्यायालयात दाखल केलेल्या जबाबावर युक्तिवाद करण्यास तयार असल्य़ाचे राज कुंद्राचे वकील प्रशांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे.
प्रशांत पाटील म्हणाले, आम्ही केस प्रकरणी युक्तिवाद करण्यास तयार आहोत. आम्हाला न्यायालयावर पूर्ण विश्वास असून सत्य समोर येईल. कुंद्रा सामिल असल्याचा कोणताच पुरावा नाही. न्यायालयात यावर युक्तिवाद करु असे पाटील यांनी सांगितले.
राज कुंद्रावर काय आरोप आहेत
पॉर्न फिल्म्सची निर्मिती करून या फिल्म्स काही मोबाईल ॲप्सवर प्रदर्शित केल्या जात असल्याचे प्रकरण काही महिन्यांपूर्वी पोलिसांनी उघडकीस आणले होते. याप्रकरणात पोलिसांनी एका अभिनेत्रीलाही अटक केली होती. या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात राज कुंद्राला अटक करण्यात आली होती. मात्र या आरोपातून सुटका करण्याची मागणी कुंद्रा याने केली आहे.
Previous Articleश्रीलंकेने जिंकली फायनलची ‘ड्रेस रिहर्सल’
Next Article खडीतून साकार केले छत्रपती शिवराय








