Raisins health benefits: बदलती जीवनशैली आणि अस्वस्थ आहार यामुळे आजकाल बहुतेक लोक अॅसिडिटी आणि गॅसच्या समस्यांनी त्रस्त आहेत. यामुळेच त्यांना अपचन, उलट्या, आंबट ढेकर येणे, छातीत जळजळ, पोटदुखी, जेवल्यानंतर पोट जड होणे अशा तक्रारी होतात. जास्त त्रास झाला तर औषधांचा वापर करूनही आराम मिळत नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. गॅस आणि अॅसिडिटीपासून मुक्ती मिळवण्यासाठी मनुका एक प्रभावी उपाय मानला जातो. जर तुम्हाला खूप दिवसांपासून अॅसिडिटीचा त्रास होत असेल तर तुम्ही दररोज रिकाम्या पोटी मनुका खावे.
मनुकाचे फायदे
मनुकामध्ये पोषकतत्वे आणि जीवनसत्त्वे मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. यासाठी रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका खाल्ल्याने याचा तुम्हाला निश्चेतच फायदे होतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे आपण लवकर आजारी पडू लागतो. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करायची असेल तर खाण्यापिण्यातही बदल करायला हवा. मनुका तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करतो. यासाठी आहारात रोज मनुकांचा समावेश करा.
रिकाम्या पोटी मनुका खा
आपल्यापैकी बहुतेकजण सर्वसाधारणपणे मनुका खातात. पण रात्रभर भिजवल्यानंतर सकाळी ते खाल्याने त्याचा फायदा दुप्पट होतो. मनुका भिजवल्यानंतर त्यातील अँटिऑक्सिडंट्स आणि पोषक तत्वांची पातळी आणखी वाढते. दररोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलेल्या मनुका खाल्ल्याने गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून लवकर आराम मिळतो. या समस्या दूर करण्यासोबतच इतरही अनेक आजार याच्या सेवनाने टाळता येतात. मनुकामध्ये फायबरचे प्रमाण जादा असते. याचा फायदा तुम्हाला पचनाच्या समस्या दूर ठेवतात आणि तुमची पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात.
एका दिवसात किती मनुका खावे
दिवसभर उत्साही राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी किमान रोज रात्री २० ते ३० मनुके पाण्यात भिजवा. त्यानंतर सकाळी पाण्यासोबत मनुका घ्या. मनुकामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स रॅडिकल्स किंवा ट्यूमर पेशींची निर्मिती रोखण्याचे काम करतात. यामुळे कर्करोग आणि हृदयविकार दूर ठेवण्यास मदत होते.
मनुका पाणी पिण्याचे फायदे
काही लोक मनुके भिजवल्यानंतर त्यात उरलेले पाणी फेकून देतात. हे पाणी पिण्याचे अनेक फायदे आहेत.मनुक्याचे पाणी प्यायल्याने पोट साफ राहते.
रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
शरीरात लोहाची कमतरता भासत नाही
वजन कमी करण्यास मदत करते.
ते प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ सहज बाहेर पडतात.
मनुका पाणी प्यायल्यानेही रक्त शुद्ध होते.
Disclaimer: ही माहिती सर्वसाधारण माहितीवर आधारीत आहे. त्याचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेवून याची खात्री करा.
Previous Article‘लेमनग्रास’ आरोग्यासाठी ठरते प्रभावी; ‘हे’ आहेत फायदे
Next Article कोकण रेल्वे मार्गावर आढळला तरुणाचा मृतदेह









