गोव्यात सरासरी 99 इंच नोंद : आज-उद्या कमी प्रमाणात पाऊस
पणजी : गोव्यात बुधवारी पावसाचा जोर कमी राहिला, मात्र गेल्या 24 तासांमध्ये 2.5 इंच पावसाची नोंद झाल्याने राज्यातील पाऊस आता 99 इंच झाला आहे. आज व उद्या पावसाचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. गोव्यातील पाऊस सरासरी 99 इंच झाला आहे. वार्षिक सरासरीपर्यंत पाऊस पोहोचला आहे. केवळ 1 टक्के पाऊस कमी ठरतोय. गेल्या 24 तासांमध्ये सर्वाधिक 3.5 इंच पाऊस केपे, वाळपई, धारबांदोडा व फोंडा येथे पडला. दाबोळीत 3 इंच, पेडणे पावणेतीन इंच तर मुरगावात 2.5 इंच, सांखळी, सांगे येथे प्रत्येकी 2.5 इंच, म्हापसा 2 इंच, पणजी 2 इंच, जुने गोवे 2 इंच, काणकोण व मडगाव येथे प्रत्येकी दीड इंच पाऊस पडला. हवामान खात्याने तीन दिवसांकरीता ग्रीन अलर्ट घोषित केला आहे. या दरम्यान पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिल. ऐन गणेश चतुर्थीदिवशी व त्याच्या दोन दिवस अगोदर गोव्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.









