नदीच्या पाण्याची पातळी वाढली, सुपारी उत्पादकांत चिंतेचे वातावरण
प्रतिनिधी /वाळपई
सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा भागात सोमवारी दिवसभर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. घाटमाथ्यावर प्रचंड प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये देखील वाढ होऊ लागलेली आहे. रात्री उशिरापर्यंत अशाच प्रकारे पाऊस लागल्यास पाण्याची पातळी धोक्मयापर्यंत पोहोचू शकते, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून सातत्याने पाऊस पडत असल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम शेती बागयतीवर होण्याची शक्यता असून औषधाची फवारणी करून ही सुपारीची गळती मोठय़ा प्रमाणात होत आहे. यामुळे सुपारी उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलेले आहे.
सोमवारी दिवसभर मोठय़ा प्रमाणात पाऊस पडला. सत्तरी तालुक्मयाच्या जवळपास सर्वच भागामध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत होता. सकाळनंतर संध्याकाळी उशिरा पाऊस पडण्यास पुन्हा एकदा सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पाऊस पडल्यामुळे नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये वाढ होऊ लागली होती. घाटमाथ्यावर पाऊस पडत राहिल्यास नदीतील पाण्याची पातळी आणखी वाढण्याची शक्मयता वर्तवण्यात येत आहे.
पावसाळी मौसमामध्ये सुपारी गळतीवर नियंत्रण यावे म्हणून औषध फवारणी करण्यात येत असते. यंदा मात्र तीनवेळा औषधाची फवारणी करण्यात आली होती. मात्र सप्टेंबर महिन्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्यामुळे त्याचे प्रतिकूल परिणाम सुपारी उत्पादनावर होताना दिसत आहेत.









