5.06 टी एम सी पाणीसाठा,1200 क्यूसेकने विसर्ग सुरू
राधानगरी / महेश तिरवडे
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. धरणातील पाणी पातळी झपाट्याने वाढत असल्याने धरणातून सुरू असणारा 700 क्यूसेक वरून दुपारपासून 1200 क्यूसेकने विसर्ग करण्यात आला आहे .तालुक्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने ओढे नाले तुडुंब वाहत आहेत. त्यामुळे रोपलागणीच्या कामांना वेग आला आहे.
राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चोवीस तासात यावर्षीचा उच्चांकी १११मिलिमीटर पाऊस नोंदला आहे तर एकू1355 मिलीमीटर पाऊस झाला आहे,आज सायंकाळी चार वाजता धरणाची पाणीपातळी 327.16 फूट इतकी होती. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा
5.06 टीएमसी झाला आहे पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने व भोगावती नदी पात्रात विसर्ग वाढल्याने नदीकाठच्या गावांनी सतर्क राहण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.