बी. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर अद्याप पाणी
बेळगाव
सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल का?
शाळेभोवती तळे साचून सुटी मिळेल का?
हे गाणे प्रत्येकाने आपल्या लहानपणी ऐकले आहे. परंतु या गाण्याची प्रचिती सध्या बेळगावमध्ये येत आहे. बी. के. मॉडेल शाळेच्या मैदानावर तब्बल गुडघाभर पाणी असल्यामुळे खबरदारी म्हणून शाळेला सुटी द्यावी लागली आहे. बेळगाव शहराला मागील आठवड्यात पावसाने जोरदार झोडपले. यामुळे सखल भागात पाणी साचले होते. बी. के. मॉडेल शाळेच्या पटांगणावर अशाच प्रकारे पाणी साचले. पाणी वाढत गेल्याने इतर शाळा सुरू होवूनच खबरदारी म्हणून शाळेला अद्याप सुटी द्यावी लागली आहे. व्यवस्थापनाकडून पंपाद्वारे पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने अद्याप गुडघाभर पाणी आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होवू नये यासाठी ऑनलाईन अभ्यास दिला जात आहे.









