प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri News : पहिल्याच पावसाळ्यात आंबा घाटात दरड कोसळली. ही दरड रस्त्यावर आली नसली तरी आंबा घाटातील प्रसिद्ध असलेल्या गायमुख या ठिकाणी गणेश मंदिरावर ही दरड कोसळली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
दरड रस्त्यावर न आल्याने आंबा घाटातील वाहतुकी वरती कोणताही परिणाम नाही. मात्र पहिल्याच पावसात दरड कोसळण्याच्या घटनेमुळे पुढील पावसात काय परिस्थिती असेल याबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.









