कोल्हापूर: सध्या पावसाचा जोर कमी आला आहे. त्यामुळे सद्यस्थितीला धोका पातळीची स्थिती नाही. मात्र निष्काळजीपणा करून चालणार नाही. कोणत्याही क्षणी परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे नागरिकांनी सतर्क रहावे असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावर (Rahul Rekhawar) यांनी ‘तरुण भारत’ शी बोलताना केले आहे.
अलर्ट मोडवरच रहावे लागेल
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून पूरस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनासह जिल्हा प्रशासन सज्ज आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस असल्याने गेल्या 24 तासात पंचगंगेच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. गेल्या 24 तासात पंचमीच्या पाणी पातळीत दहा ते बारा फुटाची वाढ झाली मात्र सध्या पावसाचा जोर कमी आहे त्यामुळे पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीत होणारी वाढ मंदावली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार असाच पाऊस सुरू राहिला असता तर पंचगंगा नदीने इशारा पातळी किंवा धोका पातळी ओलांडली असती. मात्र सद्यस्थितीला ही परिस्थिती दिसून येत नाही. मात्र पुढील चार दिवस अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे निष्काळजीपणा करून चालणार नाही. आपल्याला अलर्ट मोडवरच रहावे लागेल असे जिल्हाधिकारी रेखावर म्हणाले आहेत.
हेही वाचा- पुढील २४ तासात धोकापातळी गाठण्याची शक्यता,नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा- राहुल रेखावार
जनावरांना स्थलांतरित करण्याच्या तयारीत राहा
तसेच नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देत अफवांवर विश्वास न ठेवता तलाठी व ग्रामसेवक यांच्या संपर्कात राहण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. पावसाचा जोर वाढत राहिल्यास साहित्यांसह जनावरांना स्थलांतरित करण्याच्या तयारीत राहावे. खबरदारी म्हणून एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज रात्री कोल्हापुरात दाखल होतील. एक पथक कोल्हापूर शहरात तर दुसरे पथक शिरोळसाठी रवाना होईल अशी माहिती ही राहुल रेखावार यांनी दिली
पावसाचे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
Heavy Rainfall Live Update: कोल्हापूरसह सातार, रायगड, रत्नागिरीला रेड अलर्ट ; हवामान खात्याचा इशारा
Kolhapur Heavy Rainfall Live Update: करवीर तालुक्यात पावसाचा जोर वाढला; कोगे-बहिरेश्वर मार्ग बंद
कोल्हापूरची पंचगंगा नदी २५ फुटांवर, मुख्यमंत्र्याकडून एनडीआरएफला सज्ज ठेवण्याचे निर्देश
Previous Articleपुण्यातील पाच माजी नगरसेवक बंडखोरांच्या वाटेवर
Next Article वेंगुर्लेत प्लॉस्टीक वापरांवर कारवाई मंगळवार पासून









