रिपरिप चालूच राहिल्याने लोकांची कामे खोळंबली. मोन्स?नपूर्व कामांमध्ये अडथळा

डिचोली/प्रतिनिधी
हवामानातील बदलामुळे सध्या गोव्यात सुरू असलेल्या पावसाने लोकांच्या मोन्स?नपूर्व कामांमध्ये अडथळा निर्माण केला आहे. यावषी राज्यात मोन्स?न लवकरच धडकणार असल्याची बातमी सर्वत्र पसरल्याने लोकांनी आपल्या घरात किंवा इतरत्र मोन्स?नपूर्व कामांना प्रारंभ केला आहे. परंतु आतापासूनच पावसाने वातावरण निर्मिती करून बरसण्यास सुरूवात केल्याने लोकांच्या कामांचा खोळंबा होत आहे.
काल मंगळ. दि. 17 मे रोजी संध्याकाळी डिचोली तालुक्मयात ढगाळ वातावरण करून पावसाने उपस्थिती लावली. त्यामुळे लोकांची तारांबळ उडालीच. परंतु पावसाची रिपरिप रात्रीपर्यंत एका चालीवर चादूच राहिल्याने लोकांच्या कामांवर परिणाम झाला. डिचोली व साखळी बाजार संध्याकाळनंतर ओस पडल्याचे दिसून आले होते.
मे महिना असल्याने अनेक कौलारू घरांची वाकारण चालू आहे. तसेच काहींनी पावसापूर्वी आपल्या घरांची दुरुस्ती काम हाती घेतले आहे. या कामांवर परिणाम झाला. कामे अर्धवट ठेवण्याची परिस्थिती आली. तर येते तीन दिवसही पाऊस बरसणार असल्याची पूर्वसूचना हवामान खात्याने दिली असल्याने लोकांना पुढील तीन दिवस या कामांना ब्रेक द्यावा लागणार आहे.
घरांच्या कामांबरोबरच विविध पंचायती व नगरपालिकांनी मोन्स?नपूर्व कामांना सुरूवात करून आता सदर कामे संपुष्टात येण्याच्या मार्गावर इहेत. परंतु पावसामुळे साफसफाई केलेल्या गटरांमध्ये पुन्हा माती व कचरा साचत असल्याने या कामगारांचे काम वाढत आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी मात्र पाणी गटरातून बाहेर येऊन रस्त्यावरून वाहताना दिसत आहे. त्यामुळे मोन्स?नपूर्व कामांची किती प्रमाणात गंभीरता संबंधित पंचायत किंवा नगरपालिकांनी घेतली आहे. याचा अंदाज येतो.
काल मंगळवारी पडलेल्या पावसामुळे संध्याकाळी कामावरून घरी जाणाऱया कामगार वर्गाची तारांबळ उडाली. तसेच कामानिमित्त बाजारात शहरात आलेल्या लोकांचीही गोची झाली. मोठा पाऊस असल्याने लोकांना अडकून रहावे लागले. तर काहींना पावसात भिजतच आपले नियोजित स्थळ गाठणे पसंत केले. पावसामुळे उकाडय़ापासून काहीसा थंडावा निर्माण झाला होता.









