दक्षिण गोव्यात 21 टक्के अतिरिक्त ; उत्तरेत 2 टक्के कमी पावसाची नोंद
पणजी : पावसाचा जोर 10 जुलैपर्यंत राहणार, अशी माहिती पणजी वेधशाळेने दिली. दरम्यान, शुक्रवारी राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस झाला. यामुळे एकूण पाऊस सरासरी 50 इंच ओलांडून पुढे पोहोचला व सरासरीच्या तुलनेत तो 4 इंच अतिरिक्त ठरला आहे. पुढील दोन दिवस राज्यात जोरदार पाऊस पडणार परंतु, त्यामुळे पूर येण्याची शक्यता नाही. 15 दिवसांमध्ये सारी उणीव पावसाने भऊन काढली. त्यामुळे वार्षिक सरासरीच्या तुलनेत पावसाने 4 इंच अतिरिक्त नोंद केली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा गोव्यात जादा पाऊस झाला आहे. गेल्या 24 तासांमध्ये सर्व केंद्रावर मुसळधार पाऊस झाल्याचे वृत्त आहे. काणकोणमध्ये सर्वाधिक 5 इंच, पेडणे 3.5 इंच, सांगे, मडगाव, केपे, दाबोळी व म्हापसा येथे प्रत्येकी 3.15 इंच पावसाची नोंद झाली. पणजी, फोंडा, जुने गोवे या केंद्रांवर सुमारे 3 इंच तर सांखळी 2.5 इंच आणि मुरगाव येथे 2 इंच पावसाची नोंद झाली.
चोवीस तासांत तीन इंच
गेल्या 24 तासांमध्ये गोव्यात सरासरी 3 इंच पावसाची नोंद झाली. त्यात 3 इंच उत्तर गोव्यात व 3.25 इंच दक्षिण गोव्यात नोंदविला गेला. यंदाच्या मौसमात उत्तर गोव्यात आतापर्यंत 45.50 इंच तर दक्षिण गोव्यात 54 इंच एवढा पाऊस पडलेला आहे. उत्तर गोव्यात केवळ 2 टक्के कमी तर दक्षिण गोव्यात 21 टक्के अतिरिक्त पाऊस झालेला आहे. यंदाच्या मौसमात सरासरी 9.8 टक्के अतिरिक्त पाऊस झालेला आहे.
शेतीची कामे जोरात सुरु
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 48 तासांमध्ये गोव्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडणार आहे. त्याचबरोबर वाऱ्याचा वेग ताशी 55 ते 60 किमीपर्यंत जाण्याची शक्यता आहे. दि. 9 आणि 10 जुलैपर्यंत जोरदार पाऊस पडणार असून त्यानंतर पावसाचे प्रमाण थोडे कमी होईल. सध्या पडणाऱ्या जोरदार पावसामुळे राज्यात शेतीची कामे जोरात सुऊ आहेत. शेतीला आवश्यक तेथून नैसर्गिक झऱ्यांचे पाणी शेतमळ्dयांवर पोहोचू लागल्याने शेतकरी वर्ग खूष झाला आहे. राज्यातील धरणांमध्ये परिस्थिती आता अत्यंत समाधानकारक आहे. पाण्याची आवक वाढत आहे. पावसाचे हे प्रमाण टिकून राहिल्यास या महिन्या अखेरीस अणजुणे धरण तुडूंब भऊन वाहू शकते तर साळावली धरणामध्ये देखील पाण्याची आवक झपाट्याने वाढत असल्याने 25 जुलैपर्यंत हे धरण भऊन वाहण्याची शक्यता आहे.
बहुतांश धरणे पन्नास टक्के भरली
काल शुक्रवारी जलस्त्रोत खात्याने दिलेल्या आकडेवारीनुसार, काणकोण तालुक्यातील गावणे धरणात सर्वाधिक 60.7 टक्के जलसाठा आहे, पण त्याच्या पाण्याचा वापर होत नाही. डिचोली तालुक्यातील आमठाणे धरणात 58.7 टक्के जलसाठा आहे. शिरोड्यातील पंचवाडी जलाशयात 47.2 टक्के, तर काणकोणातील चापोलीत 50.4 टक्के जलसाठा उपलब्ध आहे. सत्तरीतील अंजुणे धरणात 10.2 टक्के तर सांगे तालुक्यातील साळावली धरणात 46.9 टक्के इतके पाणी आहे.









