वृत्तसंस्था/लिडस्
पाच सामन्यांच्या अॅशेस कसोटी मालिकेतील येथे सुरु असलेल्या यजमान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या सामन्यात शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु असल्याने खेळ होऊ शकला नाही. चहापानानंतरही किरकोळ पावसाच्या सरी सुरु असल्याने पंचांनी तिसऱ्या दिवशीचा खेळ होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले.
या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 263 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 237 धावा केल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने शुक्रवारी खेळाच्या दुसऱ्या दिवसाअखेर दुसऱ्या डावात 4 बाद 116 धावा जमवित इंग्लंडवर 142 धावांची आघाडी घेतली आहे. ख्वॉजाने 43, वॉर्नरने 1, लाबूशेनने 33 तर स्मिथने 2 धावा केल्या. हेड 18 तर मार्श 17 धावावर खेळत आहे. इंग्लंडतर्फे मोईन अलीने 2 तर ब्रॉड आणि वोक्स यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









