पावसामुळे रस्त्यावर दलदल : अवकाळी पाऊस काही पिकांना तारक
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये बुधवारच्या दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री 7.30 वाजता अवकाळी पावसाला सुरुवात झाल्यामुळे शेतकरी वर्गाची एकच धांदल उडाली. परंतु सदर पाऊस शेतकरी वर्गासाठी समाधानकारक झाला. काल मंगळवारी तालुक्याच्या पूर्व, पश्चिम, उत्तर भागामध्ये पावसाने सलामी दिली होती. परंतु कंग्राळी बुद्रुक परिसरामध्ये पावसाने हुलकावणी दिली होती. परंतु कालची उणीव आजच्या पावसाने हजेरी लावून भरून काढण्याचे चित्र आज पहावयास मिळाले.
कडधान्य पीक सापडले
कालच्या वळीव पावसात काही शेतकऱ्यांनी काढून ठेवलेली कडधान्य पिके सापडल्यामुळे या शेतकऱ्यांना सदर पाऊस मारक ठरला. तर शेतातील सर्व कामे संपविलेल्या शेतकऱ्यांना सदर पाऊस फायदेशीर ठरल्याचे चित्र दिसून आले.
ऊस पिकाला उत्तम
कंग्राळी परिसरामध्ये ऊस पिकाची लागवड भरपूर केल्यामुळे ऊस पिकाला सदर पाऊस फायदेशीर ठरल्यामुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
जेंधळा पिकाला मारक
शेतकरी वर्ग जेंधळा उपसून वाळवून कडवा तयार करतो व हेच पावसाळ्यामध्ये सुका चारा म्हणून वापरतो. परंतु पावसामुळे जोंधळा पीक उपसणे शेतकऱ्यांना त्रासाचे जाणार आहे.









