ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यासह अनेक भागांत पावसाने (Rain) जोरदार हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती (Flood) निर्माण झाली आहे. दरम्यान, मुसळधार पावसाने पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील काही गावांचा संपर्क तुटल्याचे समजते. शिवाय, भारतीय हवामान विभागाने मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर पुढील चार दिवस दिल्ली, पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र (Maharashtra), छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये हलका ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
दरम्यन, महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात मुसळधार पाऊस पडत असून, चंद्रपूर, अमरावती, वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात वाहनांबरोबरच सात ते आठ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरातही जोरदार पाऊस झाला असून, चार गावांचा संपर्क तुटला आहे. वर्धा जिल्ह्यात एकाचा वीज पडून मृत्यू झाला असून, दोन जण पुरात वाहून गेले आहेत. वाहून गेलेल्या नागरिकांचा शोध घेतला जात आहे. तर चंद्रपुरात टाटा मॅजिक आणि भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्याला पूर आलेला असताना पुलावरून ट्रक घेऊन जाताना ट्रक वाहून गेला आहे.
राज्याच्या अनेक शहरांना मुसळधार पावसाचा फटका बसला आहे. पूर्व महाराष्ट्रामधील गडचिरोलीतील १२८ गावांचा संपर्क तुटल्याचे समजत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात पुढील तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकणातील सर्व जिह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला आहे. कोकणात २०० मिमीपर्यंत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. रत्नागिरी जिह्यातील जगबुडी व कोदवली नदी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहे.
हे ही वाचा : Kolhapur: पंचगंगा पुन्हा पात्राबाहेर
चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्यात प्रवासी असलेली गाडी वाहून गेली. प्रवाशांनी भरलेली टाटा मॅजिक गाडी गेली वाहून गेली. टाकळी-पानवडाळा दरम्यानच्या नाल्याला पूर आलेला असतानाही चालकानं दाखवलं धाडस सगळ्यांच्याच अंगलट आलं. गाडीत ५ प्रवाशी आहेत. पाण्याच्या प्रवाहात ओढली जातात प्रवाशी टपावर चढले. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी गाडीतील लोकांना बाहेर काढण्यासाठी मदत कार्य हाती घेतलं.
गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी रात्री एक ट्रक पेरमिली नाल्यावरून वाहून गेला. या ट्रकमधून पाच ते सहा लोक प्रवास करत होते. भामरागड तालुक्यातील पेरमिली नाल्याला पूर आलेला असताना पुलावरून ट्रक घेऊन जाताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ट्रक वाहून गेला. माहिती मिळाल्यानंतर एसडीआरएफची पथक शोध घेत आहेत. रविवारी सकाळपर्यंत वाहून गेलेल्या शोध लागलेला नव्हता.