वृत्तसंस्था / आलूर
यजमान कर्नाटक आणि केरळ यांच्यात येथे सुरू असलेल्या क इलाईट गटातील सामन्यात पावसाचा सातत्याने अडथळा येत आहे. या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी केरळने बिनबाद 88 धावा जमविल्या होत्या. त्यानंतर शनिवारी दुसऱ्या दिवशीच्या खेळामध्ये पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे बराच खेळ वाया गेला. केरळने दुसऱ्या दिवसाअखेर पहिल्या डावात 50 षटकात 3 बाद 161 धावा जमविल्या.
केरळ संघातील विशाल गोविंदने 79 चेंडूत 4 चौकारांसह 31 तर रोहन कुनुमलने 68 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारांसह 63 धावा जमविल्या. बाबा अपराजितने 3 चौकारांसह 23 तर संजू सॅमसनने 1 षटकार आणि 2 चौकारांसह 15 धावा केल्या. कर्नाटकातर्फे कौशिक, विशाख आणि श्रेयस गोपाल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.









