कोल्हापूर :
कोल्हापूर शहरात काल रात्री (दि. ६ ) रोजी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या चार दिवसात शहरातील थंडी अचानक कमी झाली आणि दमट हवामान पडले. दरम्यान काल रात्री शहरात पावसाने हजेरी लावली. सध्या ऋतुमान बदलत आहे. यंदा अगदी दिवाळीपर्यंत पाऊस पडत होता. त्यातून थंडीची चाहुल लागली असता फेंगल वादळामुळे अचानक वातावरणात बदल झाला. दमट हवमान पडले. अशा अवकाळी पावसाने पिकांवरही परिणाम होत आहे.
अरबी समुद्यावरील फेंगल वादळामुळे देशातील अनेक किनारपट्टींना पावसाने झोडपले आहे. अनेक किनारपट्ट्यांवरील अनेक शहरांना हवामान विभागाने पावसाचा ईशारा दिला आहे. गेल्या आठवड्यात नोव्हेंबर महिन्यातील सर्वात कमी तापामानाची नोंद अनेक शहरात झाली. तर त्यानंतर फक्त चार दिवसात थंडी कमी झाली. यामुळे हवामान खात्याने किनारपट्टीवरील अनेक शहरांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.








