वृत्तसंस्था/ नॉर्दम्पटन
येथे सुरु असलेल्या इंग्लंड लायन्स आणि इंडिया अ यांच्यातील दुसऱ्या आणि शेवटच्या अनधिकृत कसोटी सामन्यात रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पावसाचा अडथळा आल्याने खेळ थांबविण्यात आला. त्यावेळी इंग्लंड लायन्सने पहिल्या डावात 9 बाद 281 धावा जमविल्या होत्या. इंग्लंड लायन्सचा संघ अद्याप 67 धावांनी पिछाडीवर आहे. इंडिया अ संघातील वेगवान गोलंदाज खलील अहमदने 55 धावांत 4 गडी बाद केले.
या सामन्यात इंडिया अ संघाने पहिल्या डावात 348 धावा जमविल्या. केएल राहुलने 116 तर जुरेलने 52, करुण नायरने 40, नितीशकुमार रे•ाrने 34, शार्दुल ठाकुरने 19, जयस्वालने 17 धावा केल्या. इंग्लंड लायन्स संघातील वोक्सने 3 तर टंग आणि हिल यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
इंग्लंड लायन्सने 3 बाद 192 या धावसंख्येवरुन रविवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला प्रारंभ केला. भारताच्या अचूक गोलंदाजीसमोर इंग्लंड लायन्सचे फलंदाज ठराविक अंतराने बाद झाले. उपहारावेळी इंग्लंड लायन्सने 71 षटकात 8 बाद 266 धावा जमविल्या होत्या. सलामीच्या हेन्सने 9 चौकारांसह 54, गे ने 7 चौकारांसह 71, कॉक्सने 7 चौकारांसह 45, फरहान अहमदने 2 चौकारांसह 24 धावा केल्या. उपहारानंतर खेळाला प्रारंभ झाला पण पावसाला प्रारंभ झाल्याने खेळ थांबविण्यात आला त्यावेळी इंग्लंड लायन्सने 76.2 षटकात 9 बाद 281 धावा जमविल्या होत्या. खलील अहमदने 55 धावांत 4 तर तुषार देशपांडेने 62 धावांत 2 तसेच कंबोज, कोटीयन आणि नितिशकुमार रे•ाr यांनी प्रत्येकी 1 बळी मिळविला.
संक्षिप्त धावफलक – इंडिया अ प. डाव 89.3 षटकात सर्व बाद 348 (केएल राहुल 116, जुरेल 52, नायर 40, नितीशकुमार रे•ाr 34, जैस्वाल 17, ठाकुर 15, वोक्स 3-60, टंग व हिल प्रत्येकी 2 बळी), इंग्लंड लायन्स प. डाव 76.2 षटकात 9 बाद 281 (गे 71, हेन्स 54, कॉक्स 45, फरहान अहमद 24, अवांतर 37, खलील अहमद 4-55, देशपांडे 2-62, कंबोज, कोटीयन व रे•ाr प्रत्येकी 1 बळी).









