विवेक अग्निहोत्रींनी दिली माहिती
द काश्मीर फाइल्सच्या जबरदस्त यशानंतर दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांचा ‘द व्हॅक्सीन वॉर’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या घोषणेपासूनच चाहते याची प्रतीक्षा करत आहेत. अलिकडेच या अंतिम शेड्यूलचे चित्रिकरण सुरू झाले आहे. राइमा सेन ही स्वत:च्या उत्तम अभिनयासाठी ओळखली जाते. बॉलिवूडमध्ये तिला फारसे यश मिळाले नसले तरीही बांगला चित्रपटसृष्टीत तिला यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखले जाते.

अशा स्थितीत चित्रपटाच्या कलाकारांच्या यादीत आता राइमा सेनच्या नावाची भर पडली आहे. अग्निहोत्री यांनी अलिकडेच एक व्हिडिओ शेअर केला असून यात ते राइमाची ओळख करून देताना तसेच अभिनेत्री आता या चित्रपटाचा हिस्सा झाल्याची माहिती देताना दिसून येत आहेत. या चित्रपटात नाना पाटेकर आणि अनुपम खेर यासारखे दमदार अभिनेते दिसून येणार आहेत.
चित्रपटाची कहाणी कोरोना लसीवर आधारित आहे. हा चित्रपट कोरोना महामारीच्या अनिश्चितेच्या कालावधीत वैद्यकीय जगत अणि वैज्ञानिकांच्या समर्पणाला दर्शविणारा असणार आहे. चित्रपट विजयादशमीच्या आसपास हिंदी, इंग्रजी, बांगला, मराठी, पंजाबी, भोजपुरी, कन्नड, तमिळ, तेलगु, मल्याळी, गुजराती भाषेत प्रदर्शित केला जाणार आहे.









