वृत्तसंस्था/ जयपूर
शनिवारपासून येथे सुरू झालेल्या वरिष्ठांच्या राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप स्पर्धेत रेल्वेच्या मल्लांनी दर्जेदार कामगिरी करत ग्रीको रोमन पद्धतीमध्ये 6 सुवर्णपदकांची कमाई केली. ग्रीको रोमन पद्धतीच्या 72 किलो वजन गटातील अंतिम लढतीत रेल्वेच्या कुलदीप मलिकने महाराष्ट्रच्या समीरचा 5-1 अशा गुणांनी पराभव करत सुवर्णपदक घेतले. त्यानंतर 97 किलो वजन गटात रेल्वेच्या नितेशने, 77 किलो गटात विकासने, 87 किलो गटात सुनीलकुमारने, 67 किलो गटात आशूने तर 82 किलो गटात रहित दाहियाने सुवर्णपदक पटकाविले. हरियाणाच्या सनीकुमारने 63 किलो वजन गटात सुवर्णपदक पटकाविले.









