दररोज शेकडो लोक करतात प्रवास

जपानला जगातील सर्वात वेगवान, अत्याधुनिक आणि उत्तम रेल्वेंचे घर मानले जाते. येथील रेल्वेची सुविधा उच्चदर्जाची आहे. परंतु तेथे फिरायला जाणाऱया लोकांना सध्या एक विशेष रेल्वे अत्यंत पसंत पडत आहे. मियाजाकी प्रांतात सुंदर दृश्ये दाखविणारी आमातेरासू ट्रेन एका विशेष इंधनाद्वारे धावते. हे इंधन आहे रेमन सूप. जपानच्या लोकांचा हा अत्यंत पसंतीचा खाद्यपदार्थ आहे. या ईको-प्रेंडली रेल्वेला ऊर्जा पुरविण्यासाठी वापरण्यात आलेले खाद्यतेल आणि शिल्लक शोरबेला बायोडिझेलमध्ये रुपांतरित करण्यात येते.
टोनकोत्सुक रेमन शोरबा नावाच्या या बायोडिझेलला शहराच्या दोन हजार रेस्टॉरंटमधून जमा केले जाते. 90 टक्के इंधन खाद्यतेलातून तर उर्वरित 10 टक्के शिल्लक रेमन शोरबातून तयार होते. या वसायुक्त सूपला बायोडिझेलमध्ये रुपातंतिर करण्यासाठी फॅटला अशाप्रकारे रिफाइन केले जाते की ते घट्ट किंवा जाडसर होऊ नये.
पर्यटक या रेल्वेमधून प्रवास करणे पसंत करतात कारण यात वेगळय़ा प्रकारचा गंध देखील येतो. विशेष बाब म्हणजे हे बायोडिझल पूर्णपणे भरलेल्या आमेतरासु ट्रेनला चालविण्यासाठी पुरेसे असते आणि याचा खर्च देखील फॅसिल फ्यूअलइतकाच येतो. रेस्टॉरंटमध्ये शिल्लक राहिलेले पूर्ण अन्न यात वापरले जात असते.
अमेतरासु रेल्वेचे डबे गुलाबी रंगाने रंगविण्यात आले आहेत. ही रेल्वे पर्यटकांना ताकाचिहो शहराची भ्रमंती घडवून आणते. यादरम्यान पर्यटकांना सुंदर पर्वत, भातशेती आणि जपानमधील सर्वात उंच रेल्वे पूल पहायला मिळतो. दररोज हजारो लोक या रेल्वेतून प्रवास करतात. याचे संचालन करणाऱया कंपनीने इकोप्रेंडली स्वरुप कायम राखण्यासाठी बायोडिझेलचा वापर केला जात असल्याचे सांगितले आहे.









