कोल्हापूर :
मध्य रेल्वे प्रशासनाने काही रेल्वेच्या वेळेत बदल केला असून आज, बुधवारपासून याची अंमलबजावणी आहे. यामध्ये कोल्हापुरातून सुटणाऱ्या 11 तसेच कोल्हापुरात येणाऱ्या 3 रेल्वेचा समावेश आहे.
बदलेल्या प्रमुख रेल्वेंचे वेळापत्रक
रेल्वेचे नाव सध्या सुटण्याची वेळ बदलेली वेळ
कोल्हापूर–पुणे डेमू पहाटे 5 वाजता पहाटे 5.10 मिनटे
कोयना एक्स्प्रेस सकाळी 8.15 सकाळी 8.25
हजरत निझामुद्दीन एक्स्प्रेस सकाळी 9.10 सकाळी 9.35
कोल्हापूर–मिरज डेमू सकाळी 10.30 सकाळी 10.25
कोल्हापूर–तिरूपती सकाळी 11.40 सकाळी 11.45
कोल्हापूर अहमदाबाद दुपारी 1.15 दुपारी 1.30
महाराष्ट्र एक्स्प्रेस दुपारी 2.45 दुपारी 2.50
कलबुर्गी एक्सप्रेस दुपारी 3 दुपारी 3.05
कोल्हापूर–सांगली डेमू सायंकाळी 7.40 सायंकाळी 7.35
महालक्ष्मी एक्स्प्रेस रात्री 8.50 रात्री 8.55








