विमानतळ आणि रेल्वेरुळ यांचा काही संबंध असेल अशी कल्पनाही करता येणे अशक्य आहे. पण न्यूझीलंडमध्ये असे एक स्थान आहे. हे स्थानी रेल्वे आणि विमान एकाच धावपट्टीवर धावतात. हा असा एक विमानतळ आहे की जेथे रेल्वेचे रुळ विमानाच्या धावपट्टीवर टाकण्यात आलेले आहेत. या विमानतळाचे नाव गिसबोर्न विमानतळ असे आहे. येथे विमान आणि रेल्वे एकमेकांसह एकाच धावपट्टीवरुन धावताना दिसतात. या विमाततळाच्या रुंद धावपट्टीवर विमानाची धावपट्टी आहे आणि त्याच्याच जवळ रेल्वेमार्गही आहे. त्यामुळे अनेकदा विमान आणि रेल्वे दोन्ही धावताना या विमानतळावर दिसून येतात. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव विमानतळ आहे, की जेथे रेल्वे आणि विमान एकमेकांच्या शेजारुन धावताना दिसून येतात. हा विमानतळ न्यूझीलंडच्या उत्तर द्वीपाच्या पूर्व तटावर आहे. या विमानतळाच्या मुख्य धावपट्टीच्या मधोमध पामर्स्टन नॉर्थ-गिसबोर्न रेल्वे लाईन जाते. या रेल्वेलाईनच्या दोन्ही बाजूंकडून विमाने धावू शकतात आणि उड्डाण किंवा लँडिंग करु शकतात.
या विमानतळावर विमाने उतरण्याच्या किंवा उड्डाण करण्याच्या वेळा आणि रेल्वेच्या येण्याजाण्याच्या वेळा अशा प्रकारे सुनिश्चित करण्यात आल्या आहेत, की त्यांची एकमेकांशी टक्कर होण्याची शक्यता टाळण्यात आलेली आहे. एकाच रनवे वरुन विमान आणि रेल्वे कसे धावू शकतात हा एक महत्वाच्या प्रश्न प्रत्येकाला पडतो. येथे ‘वेळ’ हेच या प्रश्नाचे उत्तर आहे. ज्यावेळी रेल्वेला या धावपट्टीवरुन जायचे असते, तेव्हा रेल्वे चालकाला विमानाच्या नियंत्रण कक्षाकडून अनुमती घ्यावी लागते. विमान मध्ये येणार नाही, याची शाश्वती झाल्यानंतरच रेल्वे जाऊ शकते. धावपट्टी किंवा रनवेचे रेल्वे लाईनने दोन भाग केले आहेत. या दोन्ही भागांमध्ये विमाने उतरु शकतात किंवा विमाने उड्डाण करु शकतात. अशा प्रकारे एकाच स्थानी येथे विमान आणि रेल्वे असे दोन्ही पर्याय प्रवाशांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, रेल्वे स्थानक विमानतळावर नाही. ते विमानतळापासून काही अंतरावर आहे. हा अद्भूत विमानतळ पाहण्यासाठी प्रत्येक वर्षी अनेक लोक येतात. न्यूझीलंडला आलेले विदेशी प्रवासीही हा विमानतळ आवर्जून पाहतात. ते एक पर्यटनस्थळ बनले आहे.









