मुंबई
रेल्वेशी संबंधीत आरव्हीएनएल, जीटीएल, आयआरसीओएन यांचे समभाग शेअरबाजारात सोमवारी चांगलीच उसळी घेताना दिसून आले. यामध्ये इरकॉन (आयआरसीओएन) इंटरनॅशनलचे समभाग सर्वाधिक 15 टक्के इतकी उसळी घेताना दिसले. आयआरएफसी, एसजेव्हीएन आणि इन्फीबीम अव्हेन्युज यांचे समाभागदेखील दमदार उसळी घेत कार्यरत होते. आयआरएफसी 9 टक्के वाढत 84.80 रुपयांवर व्यवहार करत होता.









