रत्नागिरी :
रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे रेल्वेत चढणाऱ्या प्रवाशाचा मोबाईल चोरट्याने चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आह़े ही घटना शनिवारी रात्री 8.30च्या सुमारास घडल़ी दिलीप रामनाथ धारिया (63) असे या प्रवाशाचे नाव आह़े मोबाईल चोरीला गेल्याप्रकरणी दिलीप यांनी रत्नागिरी शहर पोलिसात तक्रार दाखल केल़ी
दिलीप धारिया हे 22 मार्च 2025 रोजी रत्नागिरी रेल्वे स्टेशन येथे रात्री 8.30 च्या सुमारास मुंबईकडे जाणाऱ्या तेजस एक्स्प्रेस गाडीमध्ये चढत होत़े यावेळी त्यांच्या खिशातील मोबाईल चोरट्याने चोरुन नेला, अशी तक्रार दिलीप यांनी शहर पोलिसात दाखल केली. या प्रकरणी पुढील तपास पोलिसांकडून करण्यात येत आह़े








