इचलकरंजी : रुकडी रेल्वे स्थानकानजीक असणाऱ्या अतिग्रे फाट्या पुढील इचलकरंजी रोडवरचे रेल्वे फाटक आज २७ सप्टेंबरपासून वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. या पुढे तीन दिवस काम सुरू राहणार असून तीन दिवस फाटक बंद असल्याने वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असे रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.
रुकडी रेल्वे स्थानका नजीकच्या इचलकरंजी रोडवरील रेल्वे फाटकावर वर्षभरापासून ओव्हर ब्रिजचे काम सुरू आहे. दरम्यान, मंगळवार २७ पासून या ठिकाणी रेल्वे फाटकाच्या आतील काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे हे फाटक वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. सध्या इचलकरंजीहून कोल्हापूरकडे जाणारी वाहने रूकडी मार्गे अतिग्रे फाट्यावर जात आहेत. हे काम 29 तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा वापर करणे आवश्यक आहे.
Previous Articleकुडचडे बाजारात पुन्हा बनावट नोटा
Next Article तीन नोटीसानंतरच सरकारी कर्मचाऱयांना सक्तीने निवृत्ती









