प्रतिनिधी/ बेळगाव
नैर्त्रुत्य रेल्वेच्यावतीने देसूर ते खानापूर दरम्यानचे रेल्वेगेट क्रमांक 371 शुक्रवार दि. 27 रोजी बंद राहणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 8 यावेळेत रेल्वेगेट बंद असणार आहे. दुरुस्तीचे काम केले जाणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन नैऋत्य रेल्वेकडून करण्यात आले आहे.









