नवी दिल्ली
उर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी कोळसा पुरवठय़ात वाढ केल्याने भारतीय रेल्वेच्या उत्पन्नात ऑगस्टमध्ये वाढ नोंदवली गेलीय. मालवाहतुकीतून ऑगस्ट महिन्यात 12 हजार 926 कोटींची प्राप्ती भारतीय रेल्वेला झालीय. तर या आर्थिक वर्षात उत्पन्न 66 हजार 658 कोटी रुपयांवर पोहचले आहे. मागच्या महिन्यात रेल्वे मालवाहतुकीद्वारे 119 दशलक्ष टन मालाचा पुरवठा केला असून तो वर्षाच्या पातळीवर 7.9 टक्के अधिक आहे. ऑगस्टमध्ये उत्पन्न मागच्या वषी समान महिन्यापेक्षा 18 टक्के अधिक राहिले.