Hatkanangale Railway News: हातकणंगले येथील नव्याने रेल्वे उड्डाण पुलाची उभारणी करण्यात आली आहे. या पुलाखालील बोगद्यामधील पाण्याचा निचरा ठेकेदाराकडून व्यवस्थीत करण्यात आला नाही.त्यामुळे थोडासा देखील पाऊस पडला तरी या रेल्वे उड्डाण पुलाच्या बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहू लागल्याने यांचा मोठा मानसिक त्रास वाहनधारकांना सहन करावा लागत आहे. मंगळवारी पहाटे पासून हातकणंगले तालुक्यात परतीचा जो ढगफुटी सदृश्य पाऊस झाला.त्या पावसाच्या पाण्याने या रेल्वे उड्डाण पुलावरुन बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोसळू लागल्याने बोगद्याला धबधब्याचे स्वरुप आले.
हातकणंगले येथून लोहमार्ग गेला आहे.या मार्गावरून गेलेल्या रस्त्यावर रेल्वे गेट आहे. या गेटवरून रेल्वेची ये जा होत असताना हे गेट बंद करण्यात येते. त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतुक काही काळ बंद करण्यात येत असल्याने वाहनाच्या लांबच्या लांब रांग लागतात. याची रेल्वे खात्याने विशेष दखल घेतली. या रेल्वे गेटच्या ठिकाणी लाखो रुपये खर्चाच्या रेल्वे उड्डाण पुलाला मान्यता दिली.सुमारे तीन वर्षापासून रेल्वे उड्डाण पुलाच्या कामाला सुरुवात होवून ते काम काही दिवसापूर्वी पूर्णत्वाला आले आहे.पण या रेल्वे उड्डाण पुलाच्या संबंधीत ठेकेदाराने पुलाखाली खोदलेल्या बोगद्यामध्ये साचत असलेल्या पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था केलेली नाही.
त्यामुळे थोडासा देखील पाऊस झाला.तर या पुलाच्या बोगद्यामध्ये पाणी मोठ्या प्रमाणात साठून राहत आहे यामध्येच मंगळवारी पहाटे या परिसरात झालेल्या परतीच्या ढगफुटीसदृश्य पावसाचे पाणी बोगद्यामध्ये कोसळू लागल्याने बोगद्याला धबधब्याचे स्वरूप आले.तसेच बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिल्याने बोगद्याला ओढ्याचे स्वरुप आले.त्यामुळे या बोगद्यामधून होणारी वाहतुक पुर्णपणे बंद पडली आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









