सोलापूर,प्रतिनिधी
Railway News : आषाढी एकादशी गुरुवारी पंढरपुरात साजरी होत आहे.या सोहळ्यसाठी १२ ते १५ लाख भाविक येतील असा प्रशासनाचा अंदाज आहे.लाडक्या विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर भाविक परतीच्या प्रवासासाठी रेल्वेला अधिक पसंती देतात.आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांची सुरक्षा ही महत्त्वाची मानली जाते.भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेने २४ जून ते ३ जुलै दरम्यान तब्बल १८२ फेऱ्या सोडण्यात आले आहेत.यात ८२ स्पेशल गाड्या तर ९९ नियमीत गाड्यांचा समावेश आहे.यात आरपीएफ कर्मचारी, तिकीट बुकिंग स्टाफ,तिकीट चेकिंग स्टाफ,वैद्यकीय कक्ष,श्वानपथक,ॲम्बुलन्स आधी सुविधा असणार असल्याची माहिती सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल.के.रणयेवले यांनी माहिती दिली.
आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाचे दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासासाठी भाविक रेल्वेने प्रवास करतात.भाविकांची गैरसोय होऊ नये तसेच कोणताही अनधिकृत प्रकार होऊ नये यासाठी रेल्वेने अधिकचे कर्मचारी पंढरपूर रेल्वे स्थानकावर सज्ज केले आहे.तसेच संपूर्ण यात्राकाळात पंढरपुरात राहून बंदोबस्तावर वरिष्ठ अधिकारी लक्ष ठेवणार आहे.आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल के रणयेवले यांनी सोमवारी (दि. २६) बैठकीत बंदोबस्ताचा आढावा घेतला.तसेच पंढरपूर रेल्वे स्थानकावर पिण्याची पाण्याची व्यवस्था स्वच्छता आदींची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले.
ठळक बाबी…..
– ३४ आरपीएफ अधिकारी कर्मचारी
– तिकीट बुकिंग साठी 15 कर्मचारी असणार
– तिकीट चेकिंग साठी 15 कर्मचारी असतील
– विभागीय स्तरावरील प्रत्येक विभागाचे 13 अधिकारी असणार आहेत
– रेल्वे स्थानकावर वैद्यकीय कक्ष असणार असून यात डॉक्टर मेडिकल स्टाफ ॲम्बुलन्स कार्यरत असणार
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर रेल्वे स्थानकावर सोलापूर विभागाकडून भाविकांच्या सुविधेसाठी सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर जादा अधिकारी, कर्मचारी उपस्थित असणार आहेत.
– एल. के. रणयेवले, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, सोलापूर









