वसगडे,वार्ताहर
Sangli News : रेल्वे प्रशासनाने आमच्या शेतीत केलेले अतिक्रमण,बंद केलेले शेत रस्ते पुर्ववत चालू करण्यासाठी व केलेल्या अन्याया विरोधात पलुस तालुक्यातील वसगडे येथील शेतकऱ्यांनी आज वसगडे -नागाव मार्गावरील रेल्वे गेट परिसरातील आंदोलनाला सुरुवात केली .सर्व शेतकरी आपल्या शेतात टाकलेल्या हद्दीमध्ये रुळावर बसून ठिया आंदोलन करणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाआहे. रेल्वेचे पोलिस अधिकारी सध्या आंदोलकांशी चर्चा करीत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथे संबंधित शेतकऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस जिल्हाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांनी मार्गदर्शन करीत २२ ऑगष्ट अखेर संयुक्त मोजणी प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचे आदेश दिले होते. उपजिल्हाधिकारी मा.डॉ.विकास खरात,उपविभागीय अधिकारी कडेगाव डॉ.विजयसिंह देशमुख तसेच तहसीलदार पलूस निवास ढाणे,भूमी अभिलेख व रेल्वेचे अधिकारी व वसगडे येथील शेतकरी यांच्या उपस्थित पार बैठक पार पडली होती.
३१ ऑगष्ट अखेर खाजगी वाटाघाटी पूर्ण करून प्रस्ताव मूल्यांकनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविणे आवश्यक होते. परंतु, याबाबत हालचाली होत नसल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. सप्टेंबर २०२३ अखेर संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांना मोबदला देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी संबंधित विभागास दिल्या होत्या. पण हालचाली थंड पणे सुरू आहेत.