लंडन
भारतीय वंशाच्या ब्रिटिश डाटा वैज्ञानिकाला युकेमधील रेलस्टाफ पुरस्कार-2023 ने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय वंशाच्या वैज्ञानिकाला नवोदित श्रेणीत हा पुरस्कार मिळाला आहे. डाटा वैज्ञानिक स्मितल ढाके यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव येथे झाला होता. त्यांनी इंग्लंडच्या वॉटफोर्ड ग्रामर स्कूलमधील शिक्षण पूर्ण केल्यावर किंग्स कॉलेज, लंडनमधून पुढील शिक्षण घेतले होते.









