रांची :
अनुसूचित जमातीच्या श्रेणीत सामील करण्याच्या मागणीवरून झारखंडमधील कुडमी समाजाने रेल रोको आंदोलन सुरू केले आहे. राज्यात याचा प्रभाव दिसून येत आहे. तसेच या आंदोलनामुळे बिहारमधील अनेक रेल्वेफेऱ्या प्रभावित झाल्या आहेत. आंदोलक कोलकाता-दिल्ली रेल्वेमार्गावर ठाण मांडून बसल्याने येथील रेल्वेवाहतूक ठप्प झाली आहे.









