Raigad Suspicious Boat Case : रायगड संशयित बोट प्रकरणी ATS ने मोठी माहिती दिली आहे. बोटीमध्ये AK47 नंतर आणखी नवी शस्त्रं सापडली आहेत. एटीसला बोटीमध्ये 2 तलवार आणि 2 चॉपरही मिळाले आहेत. एटीएसने या बोटीची तपासणी केल्यानंतर या प्रकरणी मुंबईतील काळाचौकी पोलीस ठाण्यात मुंबईत आर्म्स अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
गुरुवारी सकाळी राज्यातील रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वर-श्रीवर्धन किनारपट्टीवर 16 मीटर लांबीची एक संशयास्पद बोट सापडली होती, ज्यावर तीन एके-47 रायफल आणि काडतुसं सापडली होती. मात्र, या प्रकरणात दहशतवादाचा कोणताही पैलू नसल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. या संशयास्पद बोटीचं नाव लेडी हान असून तिची मालकी एका ऑस्ट्रेलियन महिलेकडे असल्याची माहिती फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत दिली होती. या बोटीतून तीन ‘अॅसॉल्ट रायफल’, स्फोटकं आणि कागदपत्रंही जप्त करण्यात आल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं. दहीहंडीचे कार्यक्रम आणि गणेशोत्सवाच्या तोंडावर बोटीवर शस्त्रं सापडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र या प्रकरणात कोणताही दहशतवादी संबंध सापडला नसल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.
Previous Articleझटपट होणारे पौष्टिक आणि चविष्ट दुधीभोपळ्याचे थालीपीठ
Next Article रयत संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन








