Raigad Irshalwadi landslide Accident News: रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यात असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री दरड कोसळली. गावातील जवळपास 50 घरं ढिगाऱ्याखाली गाडली गेली आहेत. या दुर्घनेट आतापर्यंत 12 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 100 जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती आहे. पावसामुळे मदत करण्यास अडचण येत आहे. येथील ग्रामस्तांच्या पुर्नवसनाबाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रशासनाकडून अद्यावत माहिती घेण्याचे काम सुरु असून, जखमीवरील खर्च शासन करील असे आश्वासन शिंदे यांनी दिले.
घटनास्थळी एनडीआरएफचे पथक सकाळीच याठिकाणी पोहचले मात्र, सोसाट्याचा वारा तसेच, वरून अद्यापही काही दगड खाली येत आहेत. यामुळे बचाव पथकालाही धोका निर्माण झाला आहे. पण, जे अडकले आहेत त्यांना तातडीने रेस्क्यू करून वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. इर्शाळवाडी गावात पोहोचण्यासाठी पायवाट आहे. त्यामुळे गावापर्यंत मोठ्या मशीन्स आणि वाहनं घेऊन जाणं अवघड होत आहे.
इर्शाळवाडीत भूस्खलन झालेल्या ठिकाणी वाहन पोहचणे कठीण असल्याने याठिकाणी पायी जावं लागत आहे. मुख्यमंत्री शिंदे आणि प्रशासन याठिकाणी दाखल झाले. यावेळी शिंदे यांनी आस्थेने विचारपूस केली. अपघातग्रस्तांना धीर देत सरकार सर्वतोपरी सहाय्य करेल, अशी ग्वाही यावेळी दिली.








