प्रतिनिधी,रायगड
Ratnagiri Accident News : रत्नागिरीवरून मुंबईला जाणाऱ्या लक्झरी बसला ट्रकने धडक दिल्याने अपघात झाला. यात १६ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना माणगांव उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असून,त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.धडक समोरासमोर झाल्याने काही प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.तर ट्रक चालक व बस चालक देखील जखमी झाले आहेत.
घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, गुरू पौर्णिमेनिमित नवी मुंबई येथील नागरिक ३ जुलै रोजी नरेंद्र महाराज यांच्या दर्शनासाठी नाणीज रत्नागिरी येथे गेले होते.दर्शन घेवून हे प्रवासी रात्री निघाले. सकाळी पोलादपुरनजीक लक्झरी बस पंक्पर झाल्याने पंक्पर काढून झाल्यानंतर या ठिकाणी लक्झरी बसचा चालक बदली झाला.पुढे ही बस माणगांव इंदापुर सोडून धरणाची वाडी गावा जवळ आली असता समोरून येत असलेला ट्रक व बसची जोरदार धडक होऊन अपघात झाला. ही लक्झरी बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात जाऊन पलटी झाली.यामध्ये ट्रक चालक व बस चालक हे जखमी झाले आहेत.मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे कोलाड ते इंदापुर पर्यत रस्त्याच्या एक साईटचे काम चालू असून बऱ्याच जागी दुभाजक नसल्यामुळे अपघात होत असल्याचे दिसत आहे.
या अपघातात जखमी झालेल्यांची नावे
कवीता करके ( वय-४५ नवी मुंबई), पांडूरंग पाष्टे (वय-४४ मुंबई), मयांक वडकर ( वय-३० नवी मुंबई), शैलेश सकपाळ ( वय-३० नवी मुंबई), दत्ता शिर्के (वय-नवी मुंबई), सुरेश वाघ (वय- ५० नवी मुंबई), प्रमोद शर्मा (वय- २० मुंबई), प्रकाश ( वय-६६ नवी मुंबई), अनिल जाधव (वय- ५० नवी मुंबई), गणपत खेनले (वय-५८ कळवा), तुकाराम चव्हाण (वय- ५५ नेरूळ), प्रकाश ( वय-६८ वाशी), सोनाली शेडगे (वय- ३० नवी मुंबई), संतोष साळवे ( वय-३४ नवी मुंबई), अशिष शेलार (नवी मुंबई), कैलास राठोड (वय- ४५ नवी मुंबई) अशी आहेत.










