उमरगा पोलिसांनी 2 लाख 35 हजार रुपयांचा मुद्द्यामाल केला जप्त
उमरगा : उमरगा तालुक्यातील पळसगाव तांडा येथे उमरगा पोलिसांनी शनिवारी सकाळी दोन अवैध गावठी दारू अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत दोन लाख 35 हजार रुपयाचे मुद्देमाल जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
उमरगा तालुक्यातील पळसगाव तांडा येथे अवैध गावठी दारू निर्मिती होत असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहतीनुसार उपविगीय अधिकारी पोलीस सदाशिव शेलार व पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या एका पथकाने शनिवारी सकाळी अचानक छापा मारला. या छाप्यात दोन लाख 35000 रुपये किमतीचे मुद्देमाल जप्त केले.









