वेश्या अड्यावर गुरुवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला
कोल्हापूर : कात्यायनी (ता. करवीर) येथील फार्महाउसमध्ये सुरु असलेल्या वेश्या अड्यावर गुरुवारी पहाटे पोलिसांनी छापा टाकला. यामध्ये मुंबई, नागपूर, दिल्ली येथील 6 पिडीत महिलांची सुटका करुन, मोबाईल, रोख रक्कम, मोपेड असा सुमारे 90 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
याकारवाईमध्ये वेश्या अड्डा चालविणाऱ्या महिलेसह तिचा पती आणि फार्म हाउस मालक अशा 7 जणांना अटक करण्यात आली. फातीमा विजय देसाई (वय 33 रा. राजीव गांधी वसाहत, मार्केट यार्ड), राहूल सुरेश लोहार (वय 33 रा. पेठवडगांव ता. हातकणंगले), अजय पाटील, परशुराम चंवडू पाटील (वय 45 रा. मलतवाडी ता. चंदगड), विनोद माळकरी, पप्पू चव्हाण, फार्म हाउसचा मालक संदीप अनिलराव कदम () अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
याबाबतची फिर्याद अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्षाच्या पोलीस हेड कॉन्स्टेबल तृप्ती सोरटे यांनी दिली. अनैतीक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष व करवीर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली.








