तिघे जण ताब्यात, रोकड जप्त
► प्रतिनिधी/ बेळगाव
खंजर गल्ली येथील मटका अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. यासंबंधी तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला असून त्यांच्याजवळून 5625 रुपये रोख रक्कम व मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या आहेत.
मार्केटचे पोलीस निरीक्षक महांतेश धामण्णावर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल हावण्णावर व त्यांच्या सहकाऱ्यांनी शनिवारी दुपारी ही कारवाई केली आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तिघा जणांवर कर्नाटक पोलीस कायदा 78 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
मोहम्मदशफी मोदीनसाब तहसीलदार (वय 69, रा. खंजर गल्ली), ऐमान हसनसाब चिकोडी (वय 31, रा. खंजर गल्ली), रफीक हुसेनसाब मुल्ला (वय 45, रा. कोतवाल गल्ली) अशी त्यांची नावे आहेत. मेन रतन मुंबई मटका घेताना या तिघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.









