सातारा, मेढा :
जावली तालुक्यातील सरताळे गावच्या हद्दीतील एका वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या लॉजवर पोलिसांनी छापा टाकला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत ही कारवाई केली आहे. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पीडित 4 महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सरताळे गावच्या हद्दीतील राज इंडियन हॉटेल लॉजवर बेकायदेशीर वेश्या व्यवसाय चालू असल्याची गोपनीय माहिती मिळताच अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक पथकाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील यांनी कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार राज इंडियन हॉटेल लॉजचा मालक सचिन भिसे, कामगार सूरज नंदकुमार भिसे (दोघे रा. सरताळे ता. जावली) या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. या तीन आरोपी विरोधात मेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, वाई पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, मेढ्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, अश्विनी पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्वेता पाटील, पोलीस अंमलदार शरद बेबले, प्रवीण फडतरे, अरुण पाटील, शिवाजी गुरव, विक्रम पिसाळ, मोनाली निकम, क्रांती निकम, मेढा पोलीस ठाण्यातील अंमलदार जनार्दन गायकवाड, रफिक शेख, नंदकुमार कचरे, विजय शिंदोलकर, वाई पोलीस ठाण्यातील अंमलदार श्रवण राठोड, नितीन कदम यांनी केली.








